Share

राज्यात लवकरच संपूर्ण अनलॉकला सुरुवात होण्याची शक्यता ! टास्क फोर्सचा अहवाल सादर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्यावर्षी पासून कोरोना रोगाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून कोरोना मृतांचा आकडा देखील अधिक आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर, विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना नियमांचे न होणारे योग्य पालन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा तिसऱ्या स्तराचे नियम लावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज्यात अनलॉकला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांनी निर्बंधात सूट देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता निर्बंध हटवून सूट देण्याबाबतचा अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या अहवालानुसार पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने अनलॉक होण्यास सुरुवात होईल, अशी महिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये विविध आस्थापनांमध्ये उपस्थितांच्या संख्येत वाढ करण्यास मुभा देण्यासह वेळेत देखील वाढ मिळण्याची शक्यता आहे.

यात महत्वाचं म्हणजे लसीकरण झालेल्या नागरिकांना उपस्थितीसाठी प्राधान्य दिले जावे अशा सूचना राज्य सरकार विविध आस्थापनांना करू शकतं. यासोबतच, पहिल्या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टोरंट यांना रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के आसनक्षमतेसह सेवा देण्यास परवानगी मिळेल. यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे गरजेचे असू शकेल. यासोबतच, दुकानांना देखील वेळेची मर्यादा वाढवून दिली जाईल असं सांगण्यात येतंय. याबाबत अधिकृत घोषणा कधी होईल उची मात्र अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!