मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यापासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर महाविकास आघाडीने केंद्र सरकारवर आरोप केले होते. मात्र, त्याला महाराष्ट्र भाजपने विरोध केला होता.
याच पार्श्वभूमीवर बोलताना आज भाजप नेते आशिष शेलार यांनी सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीन पक्षांची राजकीय ठगेगिरी सुरू आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षणच द्यायचंच नाही, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीला आरक्षण मिळवण्यासाठी करायची प्रक्रिया देखील सांगितली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि माध्यमांमध्ये मराठा आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. राज्यांना स्वत:च्या अखत्यारीत आरक्षण देण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केलेला नाही. आरक्षणाचा कायदा टिकाऊ करण्यासाठी आयोगाची निर्मिती करण्याची गरज आहे. राज्य स्तरीय आयोगामार्फत ऐतिहासिक, सांख्यकी आणि इम्पिरीकल डेटा जमा केला पाहिजे.
त्या आधारावर सरकारने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करावा. हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यावर तो सभागृहात मंजूर करून घ्यावा. नंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेल्यावर सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आरक्षणाबाबतची ही अशी प्रक्रिया आहे.’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, ‘हे सरकार शेवटचं पाऊल आधी सांगत आहे. पायाभरणी न करता इमारत उभी राहिली असं अभासी चित्रं निर्माण करण्याचं पाप केलं जात आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. कायदेशीररित्या योग्य टप्पे पूर्ण न करता आरक्षणाबद्दल राज्यकर्ते भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांनी नाना पटोलेंना त्यांची जागा दाखवली’; प्रसाद लाड यांची बोचरी टीका
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणे अवमान; पण गुन्हा नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

