Share

‘राज्य शासनाचे व्हेंटिलेटर्स केंद्रासारखे कामचलाऊ नाही’, मंत्री उदय सामंत यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणारे व्हेंटिलेटर हे उपकरणच बोगस असल्याच्या तक्रारी विविध राज्यांमधून केंद्राकडे आल्या आहेत. पीएम केअर्स फंडातून राज्यांना पाठविलेले व्हेंटिलेटर सदोष आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समोर आले आहे. त्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

‘पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले व्हेंटिलेटर बिघडणार नाही. कारण हे व्हेंटिलेटर केंद्र शासनाने पाठविलेल्या व्हेंटिलेटरप्रमाणे कामचलाऊ नाही. केंद्राने यवतमाळात पाठविलेल्या ३५ व्हेंटिलेटरपैकी केवळ २१ व्हेंटिलेटर सुरू आहेत, तर उर्वरित १४ खराब निघाले. हीच परिस्थिती केंद्राने अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविलेल्या व्हेंटिलेटरची आहे’, अशी टीका उदय सामंत यांनी केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘हे व्हेंटिलेटर्स उत्कृष्ट दर्जाचे असून निर्मात्या खासगी कंपनीचे नावही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले. शिवाय व्हेंटिलेटर्स देत असलो तरी त्याचा वापर करायची वेळच येऊ नये, अशी प्रार्थना करीत सामंत यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या आतापर्यंतच्या दक्षतेचे व भविष्यातील तयारीचे कौतुकही केले. शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असाव्यात यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न आहे.त्यानुसार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याचा हा प्रयत्न आहे’, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!