Share

नाराज नितीन राऊतांसह थोरात सोनिया गांधींना भेटले?, थोरातांनी केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीतील गाठीभेटी वाढू लागल्या आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. संजय राऊत, खा. शरद पवार यांच्यासह अनेक नेते हे दिल्लीवारी करत असल्याचे दिसून येत आहे. या नेत्यांच्या दिल्लीवारी बद्दल उलटसुलट चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील सोनिया गांधीची भेट घेतली.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनूसार नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. हा वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आहे. सोनिया गांधी यांची भेट घेताना राऊत यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही असल्याच्या चर्चा होत्या. राऊत आणि थोरात एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं बोललं जात होतं. पण आता यावर बाळासाहेब थोरात यांनी खुलासा केला आहे. दिल्लीमध्ये माझी आणि नितीन राऊत यांची भेट झालीच नाही असा दावा त्यांनी केलाय.

अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘मंत्री नितीन राऊत व मी शुक्रवारी दिल्लीत होतो. मात्र, आमची भेट झाली नाही. आम्ही दोघेही महाराष्ट्र सदनात होतो. मी तिथे गेलो तेव्हा ते बाहेर होते. मात्र आम्ही एकत्र असल्याचे माध्यमात सांगण्यात आले. माध्यमात येणाऱ्या बातम्या कल्पनाविस्तार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सगळेच खरे मानायला लागले तर अवघड आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!