🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. काँग्रेस मंत्र्यांसह आमदारांना मिळणारा निधी असो वा स्वबळाचा नारा, त्यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील बेबनाव वारंवार समोर आला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पुण्यात बोलताना उघड नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच, ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग ताकद बनवा,’ असं म्हणत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे. बारामतीमध्ये त्यांना पत्रकार परिषदेत नाना पटोले यांच्या विधानाबद्दल विचारले असता, ‘मी गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत. त्यांच्याबाबत मी कशाला बोलू ? सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’ असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
काँग्रेसला आघाडीत किती किंमत आहे?
हे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. त्यामुळे @NANA_PATOLE काय म्हणतात याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही!@PawarSpeaks pic.twitter.com/QBEj4iUQ0W— Prasad Lad (@PrasadLadInd) July 11, 2021
पवारांच्या या विधानानंतर भाजपने पटोलेंवर हल्लाबोल केला आहे. आता भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी पटोलेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘नाना पटोले यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय अस्तित्व आहे याबाबत शरद पवार यांनी विधान करून त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे नाना पटोले काय म्हणतात, काय टीका करतात याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ते चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप करतात ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पवारांनी नाना पटोलेंना किंमत किती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसची किंमत किती हे दाखवून दिलं आहे,’ असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उत्साही पर्यटकांना आवर घाला, अन्यथा..’ केंद्राच्या राज्यांना सुचना
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणे अवमान; पण गुन्हा नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

