Share

‘उत्साही पर्यटकांना आवर घाला, अन्यथा..’ केंद्राच्या राज्यांना सुचना

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्यापही कायम आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निर्बंध अद्यापही कायम आहेत. पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही अनेक उत्साही पर्यटक हे धबधबे, धरणावर मजामस्ती करण्यासाठी पोहोचत आहेत.

या गर्दीवर नियंत्रण आणले नाही तर गंभीर परिणाम उद्भभवू शकतात. त्यामुळे विविध राज्यांनी उत्साही पर्यटकांना वेळीच आवर घालावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. गृहसचिव अजय भल्ला यांनी आज रविवारी कोरोना संसर्गाची स्थिती आणि लसीकरण याचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्य आणि गृहसचिवांबरोबर उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

बैठकीत भल्ला यांनी हिमाचल प्रदेश व काही राज्यांमध्ये पर्यटन स्थळांवर अतिरिक्त गर्दी होऊ लागली असून काही उत्साही पर्यटकांकडून नियमांचे पालन न होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. ही गर्दी त्वरित आटोक्यात आणली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा दिला.

मनालीमध्ये तुफान गर्दी
हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे सध्या पर्यटकांची गर्दी जास्तच पाहायला मिळत आहे. जवळपास ६ ते ७ लाख पर्यटक मानलीमध्ये कोरोना काळात फिरायला गेले आहेत. यामुळे मनालीच्या पोलीस अधिक्षकांनी कोरोनाचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड आणि ८ दिवस कोठडीत रवानगी करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात नुकतीच कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातून येणारे पर्यटक गर्दी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!