Share

वारकरी पताका घेऊन पंढरीत; शासनाने मज्जाव केल्यानंतर देखील पायी वारी झालीच

Published On: 

पंढरपूर : राज्यात कोरोनाची लाट काहीअंशी ओसरल्याचे दिसत आहे. मात्र तरीही कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला पायी वारी काढण्यास शासनाने मज्जाव करण्यात आला आहे. यानंतर देखील शेकडो वारकरी ८ दिवसात देहू आणि आळंदी येथून पायी वारी करीत पंढरपूरला पोचले आहेत.

बंडातात्या कराडकर याना जरी शासनाने स्थानबद्ध केले असले तरी त्यांची पताका व ताल घेऊन समर्थक वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत . कोरोना संकटामुळे पायी वारी नाही असा आदेश शासनाने काढला असून 17 ते 25 जुलै कालावधीसाठी संचारबंदी लागू केली आहे . मात्र शेकडो वर्षांपासून घरात वारी असणारे पारंपरिक वारकऱ्यांनी आपला पायी वारीचा नियम न मोडता देहू आणि आळंदी येथून पायी वारी चालत पंढरपूर गाठले आहे .

हे निष्ठावान वारकरी आळंदी आणि देहू येथून आठ दिवसात पायी चालत पंढरपूरमध्ये पोचले आहेत . पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर याना प्रस्थानादिवशी प्रशासनाने नजरकैद केल्याचा आरोप करीत त्यांचे समर्थक वारकरी बंडातात्या यांची पताका आणि टाळ  पायी चालत पंढरपूर पर्यंत आणून त्यांचा पायी वारीचा संकल्प पूर्ण केल्याचे भानुदास वैराट यांनी सांगितले. पंढरपुरात शिखराचे दर्शन घेऊन हे वारकरी परत आपल्या गावाकडे परतत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!