Share

अन् केंद्राने ट्विटरला आणले वठणीवर ; ट्विटरकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती

Published On: 

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर नमतं घेतलं आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आयटी नियमांचे पालन करत ट्विटरने भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. ट्विटरकडून विनय प्रकाश यांना भारतातील स्थानिक तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियु्क्त केले आहे.

मागील काही दिवसांपासून भारतातील नवीन आयटी नियमांचं पालन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात आला होता. त्यामुळे कंपनी आणि सरकारमध्ये वादही सुरू असल्याचं दिसत होतं. ट्विटरच्या वेबसाईटवर अपडेट केलेल्या माहितीवनुसार, विनय प्रकाश हे भारतासाठीचे स्थानिक तक्रार निवारण अधिकारी आहेत.

नव्या आयटी नियमांची घोषणा झाल्यापासून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद सुरु झाला होता. ट्विटरने नव्या आयटी नियमांचे पालन करण्यास सुरुवातीला नकार दिला होता आणि त्यानंतर टाळाटाळा सुरु केली होती.

दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये या कंपन्यांना भारतात एक तक्रार निवारण अधिकाऱ्याची, एका विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक करणं बंधनकारण आहे. आलेल्या तक्रारीचे निवारण हे 15 दिवसांच्या आत व्हावे. या कंपन्यांची मुख्यालयं विदेशात असली तरी केंद्र सरकारच्या व्यवहारासाठी देशातच सोशल मीडिया कंपन्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांच्या संपर्काचा अधिकृत पत्ता असायला हवा. असे जारी करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!