🕒 1 min read
मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. यामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वच स्तरातील नागरिक हे आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
अशातच, सामान्यांच्या खिशावरील आर्थिक ताण वाढत असून तेलापासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत मोठ्या प्रमाणात भाववाढ केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल शंभरीच्या दारात गेलेलं दिसून आलं.
आज सकाळी या मौल्यवान महागड्या स्थळाला भेट दिली.. डोळ्यात पाणी आणि गाडीत तेल, अशी अवस्था झाली! #FuelPrices #PetrolDieselPrice pic.twitter.com/tFrZrrZHkO
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) July 11, 2021
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. यावरच आता मराठी चित्रपटातील लेखक तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत यावर खंत व्यक्त केली आहे. केदार शिंदे नेहमीच राजकीय तसेच सामाजिक घडामोडींमध्ये सक्रिय असतात ते नेहमीच अशा गोष्टींवर भाष्य करताना दिसतात. आता त्यांनी पेट्रोल वाढीवर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एक पेट्रोल पंम्पचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसह त्यांनी लिहिले आहे की, ‘आज सकाळी या मौल्यवान महागड्या स्थळाला भेट दिली.. डोळ्यात पाणी आणि गाडीत तेल, अशी अवस्था झाली. अशा आशयाची पोस्ट शेअर करत त्यांनी वाढलेल्या पेट्रोल आणि इंधन दरवाढीवर निषेध दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मैने खुद ये शहादत चुनी है’ ; अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज’चा टीझर रिलीज
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

