नांदेड : नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती समोर येते आहे. नांदेड परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून आज सकाळी साडेआठ वाजताच्या गावात भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. यामुळे बराच वेळ घरांचे पत्रेही हलत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात सकाळी ८.३३ मिनिटांनी वेगवेगळ्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याशिवाय अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज देखील झाल्याचे बोललं जात आहे. मात्र नांदेडमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नांदेडमधील गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा, इंजनगाव, म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोणवाडा, सुकळी, सेलू, अंबा, कौठा, खुदनापुर, किन्होळा सह वसमत या गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भुकंपाचा केंद्र बिंदु आहे आणि त्याची तीव्रता ४..४ रिस्टरस्केल असल्याची माहिती दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत रविवारी सकाळी साडेआठ वाजता जमीन हादरली. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे त्याच वेळी एकापाठोपाठ एक असे दोन आवाज झाले. हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत असे आवाज झाले. या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही.
परभणी जिल्ह्यात जमिनीतून गुढ आवाज
परभणी जिल्ह्यातील काही भागात रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जमिनीतून आवाज येत सौम्य हादरा बसला. सकाळी साडेआठ वाजता परभणीत बहुतांशी नागरिक सकाळच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना या भूकंपाच्या हादऱ्याची जाणीव झाली नाही. यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यात याची जाणीव होऊ शकते. परभणीत तशी नोंद अद्याप नाही. तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मैने खुद ये शहादत चुनी है’ ; अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज’चा टीझर रिलीज
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

