Share

‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गात उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील ४२ गावे येतात. तसेच हा रेल्वे मार्ग ८० किलोमीटर लांबीचा असून पहिल्या टप्प्यात ० ते २० किमी रेल्वे लाइनचा रेल्वे विभागाच्या डिमार्केशन करणाऱ्या एजन्सीने सविस्तर प्रस्ताव मोजणी विभागास द्यावा. त्यानंतर ३ टप्प्यात या कामांचे प्रस्ताव द्यावेत, अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइन भूसंपादन संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची, महसूल विभाग व उस्मानाबाद-सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ६० ते ८० कि.मी.चा भूसंपादन प्रस्ताव जुलै, ० ते २० कि.मी.चा भूसंपादन प्रस्ताव ऑगस्ट, ६० ते ४० कि.मी.चा भूसंपादन प्रस्ताव सप्टेंबर, ४० ते २० कि.मी.चा भूसंपादनाचे प्रस्ताव ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत रेल्वे विभागाने महसूल विभागास प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

उस्मानाबाद-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम कधी मार्गी लागणार?

केंद्र सरकारने उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या कामाचे वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाचे भूमिपजून केले होते. मात्र, त्यासाठी अद्याप निधीच मिळाला नाही. त्यामुळे काम रखडले आहे.

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या ८० किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी ९५३ कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची राज्य व केंद्र या दोन्ही सरकारची जबाबदारी आहे. मार्गावरील सात स्थानके व अंदाजे ३२७ हेक्टर एवढ्या जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, राज्य सरकार केंद्राकडे व केंद्र राज्याकडे बोट दाखवीत असल्याने हा मार्ग रखडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!