🕒 1 min read
मुंबई : येत्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यादरम्यान भारतीय संघाचा द वॉल राहुल द्रविडचे नाव प्रामुख्याने समोर आले आहे.
मात्र भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वासिम जाफरने राहुल द्रविडला भारतीय संघाचा पुर्णवेळ प्रशिक्षक म्हणून निवडू नये असा अजब सल्ला दिला आहे. त्याच्य युट्युब चॅनेलवर माहिती देताना त्याने हे वक्तव्य केले. यामागे कारण सांगताना जाफर म्हणाला की, ‘भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ अतिशय मजबुत आहे. सद्यस्थितीत भारताकडे सर्वोत्तम खेळाडूंची फौज आहे. तेव्हा या परिस्थीतीत द्रविडने १९ वर्षाखालील आणि इंडिया ए संघासोबत राहुन नविन खेळाडू घडवण्यावर भर द्यायला हवा.’ असे सुचवले.
जाफरच्या मते द्रविडने नॅशनल क्रिकेट अकादमीत जास्तीत जास्त वेळ घालवाला. त्याने भविष्यात भारतीय संघासाठी चांगले खेळाडू तयार करण्यावर भर दिला पाहिजे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. तर या दौऱ्याचा भाग नसलेले इतर खेळाडू हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आहेत. तर श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पुणे होणार आता ४ च्या काट्याला पूर्णतः बंद ; अजितदादांनी दिले सक्त आदेश
- ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही ‘त्यांचे’ पत्ते – संजय राऊत
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
