🕒 1 min read
पुणे : दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळाले आहे. १ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपद महाराष्ट्राच्या पारड्यात पडले आहे. नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे. आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि, ‘भारती पवार पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच आहेत. त्या आदिवासी असून डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना घेतलेलं दिसतंय. कपिल पाटील आग्री समाजाचे आहेत. तेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. आम्हीच त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं. त्यांना संधी मिळाली. नारायण राणे कोकणातील नेते आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते पूर्वी काँग्रेसचे नेते होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही संधी देण्यात आली. त्यानंतर डॉ. भागवत कराड त्यांना संधी दिली. तेही ओबीसीच आहेत,’ असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आम्हालाही चांगलं जगण्याचा हक्क; लसीकरणानंतर तृतीयपंथीयांच्या भावना
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पुणे होणार आता ४ च्या काट्याला पूर्णतः बंद ; अजितदादांनी दिले सक्त आदेश
- ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही ‘त्यांचे’ पत्ते – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
