Share

फोन टॅपिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती तयार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. 2016-17 मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता, आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सभागृहात केला आहे.

माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली होती. माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा असल्याचंह नाना पटोले यांनी म्हटलं होते.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस महासंचालक, आयुक्त गुप्तवार्ता विभाग आणि अतिरिक्त आयुक्त विशेष शाखा सदस्य असतील. या समितीला तीन महिन्यांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!