Share

‘सहकार खातं सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय?, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात’

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तर महाविकास आघाडीने मात्र यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ‘सहकार खातं सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात. त्यातून ते काय करु पाहत आहेत ते त्याबाबत नियम बनवल्यानंतरच कळेल. तसेच सहकार विभाग हा राज्याच्या अखत्यारितील विभाग आहे. राज्यानेच त्याबद्दल पाहावं.

केंद्राच्या हातात मल्टिस्टेट ज्या सोसायट्या असतात, मल्टिस्टेट फक्त जे कारखाने, बँका निघतात त्या केंद्राच्या हातात असतात. पूर्ण देशाचा विचार करता सहकार चळवळ ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात फोफावलेली आहे. सहकार चळवळ महाराष्ट्रात रुजली गेलीय आणि महाराष्ट्रातच वाढली आहे. या क्षेत्रात काही चुकीची लोकं आहेत. पण काही चुकीच्या लोकांमुळे संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचं आहे, असं समजण्याचं अजिबात कारण नाही’, असं रोखठोक मत अजित पवारांनी यावेळी मांडले आहे.

तसेच ‘केंद्र सरकारने काय करावं ते त्यांचा अधिकार आहे. खरंतर सहकार क्षेत्र 100 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेलं आहे. सहकार क्षेत्राशिवाय प्रत्येक राज्याने आपापले नियम लावले आहेत. खरंतर केंद्राने केंद्राचं काम करावं. राज्याने राज्याचं काम करावे’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!