Share

‘शो’ सुरु होण्याआधीच चाहत्यांची उत्सुकता पोहचली शिगेला; ‘या’ कलाकारांच्या नावाची होतेयं चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’.. हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार त्यांची नावे आता समोर येत आहे.

https://www.instagram.com/reel/COAnYmCCfP6/?utm_medium=copy_link

अभिनेत्री रसिका सुनील, ‘देवमाणूस’मुळे लोकप्रिय झालेली ग्लॅमरस अभिनेत्री नेहा खान, ‘काहे दिया परदेस’फेम ऋषी सक्सेना,अभिनेता सुयश टिळक, तेजश्री प्रधान, चिन्मय उद्गीरकर, संग्राम समेळ, ‘ अभिनेत्री अक्षया देवधर, पल्लवी पाटील हे कलाकार बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

https://www.instagram.com/p/CQBjP25FkA7/?utm_medium=copy_link

यावेळी देखील ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक लोक अधिकच खुश आहेत. बिग बॉसच्या पहिल्या सिजनचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने तर दुसऱया सिजनचे विजेतेपद शिव ठाकरे याने पटकावले होते. त्यामुळे आता हा सीजन सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार असून अनेकजण या शोची आतुरतेने वाट पाहात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!