Share

‘संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत’, ‘सामना’च्या अग्रलेखावर पंकजा मुंडेंचे भाष्य

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या दोघी भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर भाजपने स्पष्टीकरण दिलं असून त्या नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करु नका, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून पंकजा मुंडे यांच्या राजकीय भविततव्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले होते.

या सर्व घडामोडींवर पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. ‘माझ्याबद्दल संजय राऊत यांनी ‘सामना’तून लिहिल्याचे पत्रकार सांगत आहेत. पण माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. संजय राऊत यांचा मोठा अभ्यास आहे. मी त्यांच्याशी बोलले नाही असे पंकजा म्हणाल्या.

त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय?. असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं शंका व्यक्त केली होती. त्यावरही पंकजा मुंडेंनी मत व्यक्त केलं आहे. ‘मी तो लेख वाचला नाही, लेख वाचल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देईल, असे पंकजा यांनी म्हटले. तसेच, संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत, त्यांनी माझ्याशी बोलून ते लिहिलं नाही, असेही स्पष्ट केले.

आम्ही नाराज नाही
‘केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केले. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचे नाव चालते. त्यामुळे आमचं नाव चालले. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती’, असं पंकजा यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!