Share

बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज

Published On: 

बीड : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांनी महाविकास आघाडी सरकारला विविध प्रश्नांवरून धारेवर धरले. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील विविध समस्या, पाणीवाटप, जलसिंचन, रस्ते, वाळूघाट, कोविड उपाययोजना आदींबाबत सरकारला जाब विचारला.

याबाबत प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की, मागासलेल्या आणि सततच्या दुष्काळी मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष असते. हे दुर्भिक्ष टाळण्यासाठी हक्काचे पाणी मिळण्याबाबतची मागणी धस यांनी केली. ‘आमचे बीड, उस्मानाबादचे हक्काचे पाणी आम्हाला देण्यात यावे. आमच्या दोन पिढ्या गेल्या. आणखी किती दिवस जाणार?’, असा सवाल धस यांनी विधिमंडळात केला.

बीड, उस्मानाबाद या दोन जिल्ह्याला सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख व त्यानंतरच्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी आराखडा तयार केला. २६/११ ला मंजुरी मिळाली. त्या दिवशी आम्हाला २३.६६ टीएमसी पाणी दिले. पण तरतूद काय दाखवली जाते तर ७०० कोटी आणि प्रत्यक्षात पदरात पडते ३५ कोटी, ६६ कोटी. असे अत्यल्प पैसे जर जलसंपदामंत्र्यांनी दिले तर आमच्या या योजना कशा होणार आहेत? आमचे जिल्हे सिंचनाखाली कसे येणार आहेत? असा सवाल जलसंपदामंत्री व सरकारला आमदार धस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!