🕒 1 min read
श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. ५ जुलैपासून भारतीय संघाने एकत्र सराव करण्यास सुरुवात केली, भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पडले. भारताचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले होते. दाखल झाल्यानंतर त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. परंतु, आता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे.
अशातच श्रीलंका संघातील सर्व खेळाडू अलर्ट झाले आहेत. श्रीलंका क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता आणि तेथून मायदेशात आल्यावर त्यांना क्वारंटाइन रहावे लागणार आहे. इंग्लंडच्या क्रिकेट संघातील काही खेळाडूंसह सपोट स्टाफमधील सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. श्रीलंकेचे खेळाडू काही दिवस इंग्लंडच्या खेळाडूंसोबत होते.
मंगळवारी हे खेळाडू लंडनहून परतले त्यांनतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, आता श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट समोर आला आहे. श्रीलंकेच्या सर्व सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु त्यांना अजुनही विलगिकरणात रहावे लागणार आहे.
लंडनहून परतलेल्या सदस्यांपैकी एकाही खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही,”असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्व्हा यांनी सांगितले. लंडनहून परतल्यानंतर पहिले तीन दिवस सर्व सदस्य कठोर क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. चौथ्या दिवसानंतर ते जिम आणि स्वीमींग पूलचा वापर करू शकतील. हॉटेलमध्ये ते सरावही करू शकतील. सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर ते मैदानावर सरावाला जाऊ शकतात,”असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकाऱ्यानं सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून शुभमन बाहेर पडल्यास KKR संघाकडे सलामीसाठी असतील हे दोन पर्याय
- ऐसी भी क्या नाराजगी? मुंडे भगिनींकडून नुतन मंत्र्यांचे साधे अभिनंदनही नाही!
- नसीरुद्दीन शाहंना रुग्णालयातून डिस्चार्ज; फोटो शेअर करत दिली माहिती
- नारायण राणेंना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी – संजय राऊत
- राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश म्हणजे युती होणार नाही यावर शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
