Share

‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांच्या जाण्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच बड्या बॉलीवूड कलाकारांनी देखील शोक व्यक्त केला.

दिलीप कुमार यांच्या जाण्याने सर्वाधिक कोण खचलं असेल, तर त्या म्हणजे दिलीप यांच्या पत्नी सायरो बानो. यादरम्यान त्यांनी दिलीप यांचे पार्थिव पाहून जे म्हटले, त्यामुळे तिथे उपस्थित अभिनेते धर्मेंद्र यांना खूपच दु:ख झाले. त्यावेळची घटना धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर सांगितली आहे. दिलीप यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या पाली येथील घरी नेण्यात आले. तिथे त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यावेळी धर्मेंद्र देखील त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते.

धर्मेंद्र यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केला. फोटो शेअर करून त्यांनी लिहिले की, ‘सायरा यांनी जेव्हा म्हटले की, धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले आहेत…’ मित्रांनो, जीवच गेला माझा. देवा माझ्या प्रिय भावाला स्वर्ग लाभो.’ यानंतर त्यांनी आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मित्रांनो मला देखावा करता येत नाही. मात्र, मी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपला समजून बोलत आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!