Share

वंचित बहुजन आघाडीपासून प्रकाश आंबेडकर काही काळ दूर; तर प्रभारी अध्यक्ष…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजकीय क्षेत्रात अनेकदा नेते हे वैयक्तिक, आरोग्य वा इतर कारणांवरून हवापालटासाठी राजकीय क्षेत्रापासून दूर जात असतात. या नेत्यांच्या अचानक सुट्टीवर जाण्याने विविध तर्क-वितर्क लावले जात असतात. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे आता तब्बल तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नसल्याचे समोर येत आहे.

याबाबत त्यांनी स्वतः ट्विटर वर व्हिडीओ टाकून माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तर, पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत देखील त्यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

‘पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे,’ असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. तर, सध्या त्यांच्या अचानक सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

पहा प्रकाश आंबेडकर यांचा व्हिडीओ –

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/405648850737001/

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!