Share

‘मंत्रिपद मिळवण्यासाठीच राणेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना संधी देण्यात आली असून बुधवारी त्यांचा शपथविधी पार पडला. नारायण राणे याच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावर माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘राणेंनी ठाकरे कुटुंबीयावर केलेली टीका ही पद मिळवण्यासाठी केलेली धडपड होती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे सगळं महाराष्ट्राला रुचत नाही. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आणि शिवसेनेबद्दल जे काही राणे बोलतात, त्याचा उलट परिणाम होऊन मुंबई महापालिकेत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. राणे हे कोकणातले असल्यानं त्यांनी चांगलं काम करावं, अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली.

तर मंत्रिपदाची प्रतिष्ठा राहणार नाही
‘शिवसेनेला फटका बसावा म्हणून राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर तो कॅबिनेट मंत्रिपदाचा अपमान ठरेल. केंद्रीय मंत्र्यांनी देशासाठी काम करायचं असतं. शिवसेनेला फटका देण्यासाठी त्यांना संधी दिली असेल तर हे घटनाविरोधी आहे. असं होत असेल ते चुकीचं आहे. मंत्रिपद हे राज्याचा किंवा देशाचा कारभार करण्यासाठी असतं. एखाद्या पक्षाविरोधात लढावं म्हणून एखाद्या व्यक्तीला मंत्रिपद दिलं गेलं तर मंत्रिपदाची प्रतिष्ठा राहणार नाही’ अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊतांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!