मुंबई – मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. यात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ.भारती पवार,डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राजकीय जाणकार लोकांच्या मते पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा आगामी काळात भाजपला नक्की फायदा होऊ शकेल.
कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास पाहिला तर पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भिवंडी लोकसभा मतदार संघातून 2014 व 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले.
कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपिल पाटील हे देखील भाजपचे ओबीसी चेहरा आहेत. ठाणे आणि नवी मुंबईत बहुसंख्येने असलेल्या आगरी समाजाचे ते नेते आहेत. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव न देता दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांनी मागणी केली होती. या मागणीसाठी आगरी समाज आक्रमक झाला आहे. या समाजातील नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप आता शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध आणि मैत्री पाटील यांच्या पथ्यावर पडली आहे. तसेच, शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजप मजबूत करणे हेही एक कारण पाटील यांना संधी देण्यामागे असू शकते. सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पाटील यांच्याकडे पंचायत राज राज्यमंत्री करण्यात आले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
