Share

‘लग्न करून मी चूक केली’; झीनत अमान यांचा धक्कादायक खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री झीनत अमान यांनी अनेक हिंदी चित्रपटांत उत्तम काम केले आहे. एका काळात झीनत यांच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे मोठा चाहता वर्ग होता आणि आजही आहे. नुकतेच एका मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

या मुलाखती दरम्यान त्यांच्या लग्नानंतरच्या अनुभवाबाबत सांगितले आहे. यावर झीनत म्हणलाय की, ‘लग्नं झालं आणि वर्षभरातचं लग्न करून मी चूक केलीये, हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. पण तरीही हे लग्न निभवायचं, असा विचार मी केला. लग्नानंतर मी पडद्यावरून हळूहळू गायब झाले. मी माझी जबाबदारी चोख बजावत होते. परंतु तरी देखील मजहर आणि माझ्यात खटके उडत होते. त्याचं आणखी एका दुस-या तरुणीसोबत अफेअर होतं.’

पुढे त्या म्हणाल्या की, ‘मी गरोदर होते. परंतु त्यावेळी देखील माझी काळजी घेणारं कोणी नव्हतं. त्यानंतर आम्हाला एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर पहिल्याच दिवशी आता निर्णय घ्यायची वेळ आली, असं मी ठरवलं होतं. पण पुन्हा मी निर्णय बदलला. मुलाच्या जन्मानंतर तरी आमच्या नात्यातील दुरावा संपेल, असं मला वाटतं होते मात्र तसे काही झाले नाही. आमचे नात वाचवण्यासाठी मी खुप प्रयत्न केले,’ असेही त्या म्हणाल्या.

झीनत अमान यांनी 1985 मध्ये मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. मात्र झीनत आणि मजहर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते. लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. दोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताज सोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर झीनत यांनी मजहर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र मजहर यांना किडनीचा आजार असल्याने घटस्फोट होण्याआधीच मजहर यांचे निधन झाले. याआधी देखील त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी अनेकदा चर्चा होत असत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!