Share

राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश म्हणजे युती होणार नाही यावर शिक्कामोर्तब

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारानंतर मंत्रिमंडळाचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. नवीन सुरू करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राहणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: देखरेख करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील पाच राज्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्री पदी बढती दिली आहे. त्यांच्याकडे नवीन मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारात जुन्या १२ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. तर नवीन सात महिला मंत्र्यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रातील नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातून ज्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे त्यात सर्वाधिक चर्चा ही राणे यांचीच होताना दिसत आहे.

नारायण राणे शिवसेनेने नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री केले. पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिलेल्या राणे यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्यांना मंत्रीपद देण्यात आलं. कॉँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्षातून बाहेर पडल्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पुढे अल्पावधीच हा पक्ष गुंडाळून राज्यसभेची उमेदवारी मिळवत 2019 मध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा शिवसेना भाजप युतीच्या बाबत कुजबुज सुरु असतानाच  शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप आता शिवसेनेच्या विरोधात संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे अधोरेखित झाले.

कोकण हा शिवसेनेचा बेस आहे. मात्र राणे सेनेतून बाहेर पडले तेव्हापासून चित्र बदलले. राणेंमुळे शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी झालीय. सिंधुदुर्गात शिवसैनिक आणि राणे समर्थक यांचे अधूनमधून राडे होत असतात. आता तर राणेंना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे संघर्ष तीव्र होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

राजकीय वजन वाढल्याने राणे आता शिवसेनेशी दोन हात करण्यास मोकळे झाले आहेत. राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे हे युती होणार नाही याचेच स्पष्ट संकेत मानले जातात. राणे यांचा भाजपने मंत्रिमंडळात समावेश के ल्याने पुन्हा एकत्र येण्याचे दोर कापले गेल्याचेच लक्षण मानले जाते. सेनेच्या टिकाकारलाच मंत्री केलंय त्यामुळे शिवसेना-भाजप आणखी दुरावतील की एकत्र येतील? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. त्यामुळे राणेंना मंत्री करणं म्हणजे भाजप-सेनेची युतीचा मार्ग आणखी खडतर करण्यासारखं आहे हे निश्चित.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!