Share

“दिलीप कुमार यांच्या घरी जायला वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अनेक बॉलीवूड कलाकार आणि राजकीय व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या घरी गेले होते. यावरुन आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी ट्विट करत म्हणाले की, ‘ठाकरे सरकारला स्वःताच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या पालकांना भेटायला वेळ नाही मात्र, येथे जाण्यासाठी वेळ आहे. दुख:द पण सत्य’,  असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी ) वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही त्याची मुलाखत न घेतल्याने व या अनुषंगाने नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने वयाच्या २४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली.

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील हळूहळू नैराश्यात गेला. तसेच  घरची परिस्थिती बिकट असल्याने स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला आणि अखेर त्याच्या संयमाचा अंत झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यावर राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली असून यावरून आरोप प्रत्यारोप होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!