🕒 1 min read
मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. मराठा समाजातील चेहरा, तसेच शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे मुंबईसह कोकणातील येत्या स्थानिक निवडणूका बघता राणेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
राणेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्याकाळात शिवसेना आणि भाजपची युती देखील होती. मात्र, आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर राणे हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेबाबत सातत्याने आक्रमक टीका करत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे एकप्रकारे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे का ? अशी चर्चा सुरु आहे. तसेच, शिवसेनेनं भाजपचा केंद्रातील पाठींबा देखील काढून घेतल्यानंतर शिवसेनेचं रिक्त झालेलं मंत्रिपद त्यांना देण्यात येईल अशा चर्चा देखील सुरु आहेत.
भाजपच्या रणनीतीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘नारायण राणे यांनी शिवसेना सोडून 18 वर्षे झाली आहेत. कोणाला ठरवून मंत्रिपद दिलंय असं नाही. दोन्ही घराण्यांमध्ये आता हळूहळू सगळ काही चांगलं होतंय. आगामी काळात कटुता कशी कमी होईल यावर केंद्र काम करतंय असं वाटतंय,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
नारायण राणे यांचा प्रवास आणि शिवसेना –
शिवसेना आणि राणे घराण्याचे गेल्या काही वर्षांमधील असलेलं वैर हे उभ्या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलं आहे. शिवसेनेपासूनच सुरुवात झालेल्या नारायण राणे यांची नंतरच्या काळात शिवसेनेशीच कटुता झाली. १९८५ साली मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले होते. यानंतर आमदार, मंत्री आणि मग १९९९ साली शिवसेना-भाजपचं युती सरकार असताना ते शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले होते. तरनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते राज्यात मंत्री होते. काँग्रेसननंतर स्वतःचा पक्ष आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावयाच्या अटकेनंतर ईडीने बोलावणं धाडलं !
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
