🕒 1 min read
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.
या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, भाजपच्या सर्वच नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, या कारवाईचे आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये पडसाद उमटत आहेत. तर आज सभागृहात भास्कर जाधव यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगितले. त्यांनतर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
यावर उत्तर देताना विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. वळसे-पाटील म्हणाले, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी श्री. जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने शेअर केली ‘ही’ पोस्ट
- भाजप अडचणीत असताना मुंडे भगिनी कोठे आहेत? विविध चर्चांना आले उधाण
- ‘…अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’; बावनकुळेंचा इशारा
- मागास प्रवर्गासंदर्भातील माहिती मिळण्यासंदर्भात विधिमंडळाची केंद्राला शिफारस
- ‘फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार’ : दिलीप वळसे-पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
