मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘शांती’ आणि ‘क्यों की सास भी कभी बहुती’ या मालिकेतून लोकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. यामुळे मंदिरा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज कौशल यांच्या निधनाची बातमीमुळे बॉलिवूडमध्ये देखील शोक व्यक्त केला.
यानंतर आता मंदिराने सोशल मीडियावर राज कौशलच्या आठवणीत भावूक पोस्ट केली आहे. नुकतेच मंदिरा बेदीने सोशल मीडिया ट्विटरवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, RIP माझा राजी. यासोबतच तिने हृदय तुटणारी इमोजी टाकली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर दु:ख व्यक्त केले आहे.
#rip my Raji ???? pic.twitter.com/xL3sx0BONd
— mandira bedi (@mandybedi) July 5, 2021
तसेच मंदिराने राजसोबतचे इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोत मंदिरा आणि राज दोघांच्या हातात ड्रिंकचे ग्लास पहायला मिळत आहे आणि दोघेही खूप आंनदी दिसत आहे. या फोटोवर तिने हृदय तुटणारे इमोजी शेअर केलं आहे.
https://www.instagram.com/p/CQ8C864FK1J/?utm_source=ig_web_copy_link
राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केले. १९९९ साली मंदिराने दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या राज कौशल यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुझी प्रत्येक गोष्ट आवडते’; सिद्धार्थने मितालीसाठी केली रोमॅन्टिक पोस्ट शेअर
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- राज्यपालांच्या नेमणुका करताना सोशल इंजिनिअरिंगवर मोदी सरकारकडून दिले जातेय विशेष लक्ष
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

