खुलताबाद : खासदार संभाजीराजे भोसले यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या वेरूळ येथे शनिवारी (दि.३) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकास नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर महाराजांनी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी येथील काही समस्यांबाबत नागरिकांनी त्यांना निवेदन देत समस्या सोडवण्याची मागणी केली.
यावेळी परिसरातील मराठा आरक्षणासाठी आतुर झालेले नागरिक अबालवृद्ध तरुण तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तसेच खासदार संभाजीराजे भोसले यांनी वेरूळच्या गडीस भेट दिल्यानंतर यांची सुधारणा करण्याचे व परिसरातील काही स्मारकाची पडझड झाली आहे. या संदर्भात उपस्थित प्रशासकीय अधिकार्यांना विकासाबाबत सूचना केल्या. नंतर खा. संभाजी राजे यांनी शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात भेट देऊन उपस्थित नागरिकांना मराठा आरक्षणा संदर्भात जी काही लढाई सुरू केली आहे.
त्याचे नियोजन आणि आयोजन या संदर्भात चर्चा केली. यावेळी वेरूळ ग्रामपंचायततर्फे खा. संभाजीराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. यात वेरुळ येथील स्मारकात असलेली वस्तुसंग्रहालयाची बाग दुरुस्ती, पुतळा येथील फरशी काढलेली आहे त्याची दुरुस्ती, पुतळ्यावर छत्री लावण्यासाठी नवीन छत्री बसविणे, तसेच जयंती किंवा सणवार करिता हार फुले घालण्याकरिता पुतळ्यापर्यंत पोचण्यासाठी नवीन शिडीची व्यवस्था करावी यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्पादन खर्च शून्य म्हणूनच ‘झिरो बजेट’ शेती आधुनिक तंत्र!
- ‘१२ आमदारांचे निलंबन म्हणजे नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम’
- पुणेकरांना दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
- भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून राजकारण करू पाहणाऱ्या भाजपची सभागृहात अक्षरशः पिसे काढली
- औरंगाबाद पालिकेच्या ताफ्यात आता तीन कार्डियाक रुग्णवाहिका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
