🕒 1 min read
शिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्थगिती नंतर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. धोनी आयपीएल स्थगिती नंतर त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत होता. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर माहीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धोनीबद्दल अपडेट देताना दिसते. आता धोनी रांचीत नसून शिमल्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
दरम्यान, धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचा 4 जुलैला लग्नाचा वाढदिवस होता. या दिवसानिमीत्ताने दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षीने धोनीने लग्नाच्या वाढदिवसाबद्दल दिलेल्या गिफ्टचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत एका विंटेज कारचा फोटो आहे. धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त साक्षीला ही गाडी दिली आहे. फॉक्सवॅगन बीटल ही विंटेज कार धोनीने पत्नीला दिली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या या गिफ्टबद्दल धन्यवाद, असं कॅप्शन साक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात; मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार
- रहाणेच्या अपयशावर बोट ठेवत संजय बांगरने सुचवले ‘हे’ पर्याय
- भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

