Share

…अन् भाजपच्या चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला म्हणाल्या, ‘पोलिसांकडे तक्रार कर मी तुझ्या सोबत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात चांगलंच आक्रमक रूप धारण केलंय. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सरकारची चांगलीच कोंडी करण्याची रणनीती आखली होती. तसेच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यातील अधिकाऱ्याची महिलेशी असलेलं गैरवर्तन समोर आणून महिलांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर, त्यांना पडळकर यांचे समर्थक असल्याचं सांगत धमकीचा फोन आल्याचे सक्षणा सलगर यांनी ट्विट द्वारे सांगितलंय. ‘मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.’ असं ट्विट सलगर यांनी केलं होतं.

या ट्विटची दखल चित्रा वाघ यांनी घेतली असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी  सोबत असल्याचा विश्वास दिला आहे. ‘सक्षणा तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!