🕒 1 min read
मुंबई – २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ED नं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात परवा ईडीनं मोठी कारवाई करत साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, इमारत आणि जमीन जप्त केली आहे.सगळी जवळपास ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने टाकलेल्या लेटर बॉम्ब मध्ये देखील अजित पवारांचे नाव आले असल्याने त्या प्रकरणामुळे देखील पवार यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सर्व प्रकरणामुळे केवळ अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतील असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे.मी फकीर माणूस. माझं कोण ऐकतोय. आता ईडीने लक्ष घातलं आहे. त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे, असं हजारे म्हणाले.
आता जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, हजारे यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिये नंतर आता ते सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी काढले. अण्णा हजारे यांची निद्रावस्था भंग झाली नाही. राफेलच्या आवाजाने, शेतकऱ्यांच्या आक्रोशाने, महागाईच्या वणव्यानेही ढिम्म हलले नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे सावंत म्हणाले, राज्यात सरकार बदलले व अण्णा ७ वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झाले. राफेलचे भूत मोदी सरकारच्या पाठीवरून उतरणार नाही. मोदी सरकारने हे प्रकरण आपल्या एकाधिकारशाहीतून चौकशी न करता गाडलं असलं तरी राफेलचे सापळे सध्या चौकीदाराची ड्युटी संपेल याची वाट पाहत आहेत. बाहेर येतीलच! असे सावंत म्हणाले आहेत.
दरम्यान, हजारे यांनी वेगवेगळ्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे. घरकुल घोटाळा, शिखर बँक घोटाळा, यासह अनेक कारखान्यानांचे घोटाळे, सहकारी संस्थांमधील घोटाळे त्यांनी बाहेर काढले आहेत त्यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणी हजारे यांच्यामुळेच वाढल्या आहेत. आता त्यातील बऱ्याच प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादीशी संबंधित नेते असल्याने हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर असतात.
केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना हजारे यांनी दिल्लीत मोठे जनआंदोलन उभारले होते याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसला होता. त्यामुळे हजारे हे कॉंग्रेसच्या निशाण्यावर कायम असतात अशी चर्चा असते. सावंत यांच्या बोलण्याचा अर्थ काढायचा झाल्यास हजारे हे भाजपला पूरक अशी भूमिका घेतात तसेच भाजप शासन असताना होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा अर्थ घेता येईल. सावंत यांनी केलेल्या टीकेतून देखील तेच दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
- वयाचा आणि कोरोनाचा मुद्दा पुढे करून ईडीच्या चौकशीला दांडी मारणारे देशमुख दिल्लीला गेलेच कसे ?
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBIची ‘या’ बँकांवर मोठी कारवाई
- ईडीसह अन्य तपास यंत्रणांमुळे राज्यातील अनेक दिग्गज नेते लवकरच अडचणीत येणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

