🕒 1 min read
मुंबई : काही दिवसापुर्वी आयसीसीने आगामी काही वर्षात होणाऱ्या आयसीसी स्पर्धाचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार प्रत्येक वर्षी आयसीसीची एक मोठी स्पर्धा होणार आहे. या वेळापत्रकाची घोषणा होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेच्या आयोजनहक्क मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
आयसीसीच्या आगामी काळात होणाऱ्या स्पर्धेच आयोजन हक्क मिळावे अशी इच्छा सर्व क्रिकेट बोर्डाची असते. यात आघाडीवर नाव आहे बीसीसीआयचे. मात्र भारताचा शेजारी पाकिस्तान देशाच्या क्रिकेट बोर्डाने पण या स्पर्धेच्या आयोजनात रस दाखवला आहे. यासाठी पीसीबीने श्रीलंका, बांग्लादेश आणि युएईला सोबत घेत बीसीसीआयला धक्का देण्याचा विचार करत आहे. आगामी २०२५ आणि २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजीत करण्याचा आग्रह पीसीबीने धरला आहे.
२००९ साली श्रीलंका क्रिकेट संघावर पाकिस्तानमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. तेव्हापासुन पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन कमी होत आहे. यावर्षीचा टी-२० विश्वचषक युएईत आयोजीत करण्यात येणार आहे. यानंतर आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ही पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि युएईमध्ये आयोजीत करण्याचा पाकिस्तान विचार करत आहे. पाकिस्तानातील कराची, लाहोर, मुलतान आणि रावळपिंडीसह पेशावरमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान तयार होईल असे पीसीबीने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- १५ वर्षाच्या संसारानंतर आमिरने घेतला किरणशी काडीमोड
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात


