🕒 1 min read
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने काल अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितलं.
संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचं ईडीने सांगितलं. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे. डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.
ईडीच्या माहितीनुसार डिनो मोरिया आणि डीजे अकीलला ही संपत्ती २०११ आणमि २०१२ मध्ये सोपवण्यात आली होती. दोघांनीदेखील संदोसरा बंधुंकडून आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी हा व्यवहार झाल्याचं समोर आलंय. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी डिनो मोरिया आणि डिजे अकीलला काही पैस देण्यात आले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार हे पैसे कंपनीने बँक घोटाळ्यातून मिळवले असल्याने तो गैरव्यवहार आहे.
या प्रकरणी ईडीने असे म्हटले की, स्टर्लिंग बायोटेक ग्रुपचे प्रमोटर नितीन संदेसरा आणि संदेसरा यांनी पळ काढला आहे. तपासादरम्यान या 4 जणांची नावे समोर आली. एका विशेष कोर्टाने प्रमोटर भाई नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि चेतन याची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना आर्थिक अपराध करणारे पळकुटे म्हणून घोषित केले आहे.पैशांच्या अफरातफरीचं हे प्रकरण 14 हजार 500 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित आहे. स्टर्लिंग बायोटेक आणि कंपनीच्या मुख्य प्रवर्तक आणि संचालकांनी हा कट रचला होता.
दरम्यान, या कारवाई नंतर आता आमदार नितेश राणे यांनी यावर एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे. डिनो मोरिया याच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ईडीसह अन्य तपास यंत्रणांमुळे राज्यातील अनेक दिग्गज नेते लवकरच अडचणीत येणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

