🕒 1 min read
मुंबई: देशातील सर्वात मोठी स्टेट बँक असो किंवा गावातील पतसंस्था, यांच्यावर एकच शिखर बँक नियंत्रण ठेवते. ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नुकतेच रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब अँड सिंध बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन केले नाही. १६ आणि २० मे रोजी बँकेला याबाबत सूचित केले होते.
तरी देखील बँकेने निष्काळजीपणा सुरुच ठेवल्याने RBI ने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच बँकेला कारण द्या नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने इटावा येथील नगर सहकारी बँकेने देखील नियमांची उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेची या चार बड्या सहकारी बँकांवर कारवाई
मुंबईतील सारस्वत सहकारी बँक 25 लाख आणि एसव्हीसी सहकारी बँक 37.50 लाख दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक 1 कोटी 12 लाख 50 हजार आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

