Share

के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच

Published On: 

इंग्लंड : दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघ हा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जायबंदी झाला आहे.

शुभमन गील जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्माच्या जोडीला ओपनर म्हणून लोकेश राहुलला संधी मिळू शकते. केएल राहुल हा आपला आवडता खेळाडू असल्याचं विराटने अनेकवेळा सांगितलं आहे. पण राहुलने मात्र एमएस धोनी हा आपला फेवरेट कर्णधार असल्याचं म्हणाला आहे.

फोर्ब्सशी बोलताना राहुल म्हणाला, जर कोणीही कर्णधार या शब्दाचा उच्चार केला, तरी आमच्या पिढीला पहिलं नाव लक्षात येत ते म्हणजे एमएस धोनी. आम्ही सगळे त्याच्या नेतृत्वात खेळलो आहोत आणि अनेक ट्रॉफी देखील जिंकल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण त्याचा सन्मान करतं. आपल्या करियच्या कठीण काळामध्ये देखील धोनी कायम विनम्र राहिला,’ अशी प्रतिक्रिया राहुलने दिली.

‘लहान पासून मी धोनीलाच माझा प्रेरणास्त्रोत मानलं. छोट्या शहरातला मुलगा टीम इंडियाचा कर्णधार बनला, हे पाहून मलाही आत्मविश्वास मिळाला, की आपणही एक दिवस भारतासाठी खेळू,’ असं वक्तव्य राहुलने केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!