🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. संसर्गाचा वेग जरी कमी झालेला असला, तरी देखील अद्यापही नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. दुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेस अधिक गती देण्याची गरज आहे.
कोरोना लसीवरून राजकीय वातावरण तापले आहे. कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘जुलै आला, लस आली नाही’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं।#WhereAreVaccines
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 2, 2021
देशातील प्रत्येक नागरिकास लवकरात लवकर कोरोना लस देण्यात यावी, जेणेकरून येणाऱ्या कोरोना संकटापासून लोकांना वाचविता येईल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहे.
दरम्यान, भारत सरकारने जागतिक योगदिनापासून ७५ टक्के लसी राज्यांना मोफत देण्यास सुरवात कली. त्यावेळेपासून लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला आहे. जून महिन्यात राज्यांना केंद्राकडून ११ कोटी ५० लाख लसी दिल्या गेल्या. या महिन्यात ही संख्या वाढवून किमान १२ कोटी लसी देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जर विरोधी नेत्यांना यातील वस्तुस्थिती माहिती असेल व तरीही ते बेजबाबदार टीका करत असतील तर ते दुर्दैवी आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी कालच सांगितले होते. तरीही आज परत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस-शाह भेटीचा सरकार पाडण्याशी संबंध नाही’, दानवेंचे स्पष्टीकरण
- महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? शाह-फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय?
- ‘पदोन्नती आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला निर्णय घेणे अशक्य’
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

