🕒 1 min read
औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद पालिका लसींच्या प्रतिक्षेत होती. सोमवारी (दि.२८) शेवटच्या ५५० लसींवर दोन दिवस केवळ प्रोझोन मॉल याठिकाणी लसीकरण सुरु होते. कालपासून प्रोझोनमधील लसीकरणासही ब्रेक लागला होता. अखेर गुरुवारी (दि.१) मध्यरात्रीच्या सुमारास लसींचा साठा आला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
रात्री उशिरा लसींचा पुरवठा झाल्यानंतर पालिकेने पुढील नियोजन केले. सध्या १५ हजार कोविशिल्ड आणि २ हजार कोवॅक्सिन लसी मिळाल्याची माहिती लसीकरण अधिकारी स्मिता नळगिरकर यांनी दिली. मात्र १५ हजार जणांचे लसीकरण एका दिवसात होऊन हा साठा संपेल त्यानंतर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने मनपा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. शहरात चार लाख लसीकरणाचा टप्पा आत्तापर्यंत पूर्ण झाला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून लसींच्या निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिम पुन्हा एकदा बारगळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
त्यातच लस घेण्यासाठी बंद आरोग्य केंद्रांवर नागरिक दररोज लसींची विचारपूस करण्यासाठी येत होते. अखेर गुरुवारी (दि.२) नागरिकांची प्रतिक्षा संपली. काल मध्यरात्रीच्या सुमारास १५ हजार कोविशिल्ड तर २ हजार कोवॅक्सिन लसींचा साठा मनपास प्राप्त झाला. मध्यरात्री नंतर यासंदर्भात पालिकेने नियोजन केले. गुरुवारी रात्री उशिरा लसींचा पुरवठा झाला.
त्यानुसार आज (दि.२) शहरातील ३९ आरोग्य केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ १५ हजार कोविशिल्ड लसी असल्याने कमी केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे. मात्र यातील काही ठिकाणी गर्दी झाल्यास इतर केंद्र सुरु करण्यात येतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र हा साठा एकच दिवसात संपून जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- LICची नवी योजना; एकावेळी प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवा 12 हजार रुपये
- पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला, ‘हे’ निर्बंध राहणार कायम; अजित पवारांच्या सूचना
- ‘सरकार पाडण्यासाठी रणगाडे, आर्मीची गरज नाही’, दानवेंचे राऊतांना प्रत्युत्तर
- जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती प्रकरण काय आहे?
- महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? शाह-फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

