🕒 1 min read
जालना: शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी बंदुका, रणगाडे, आर्मी घेवून येवुद्या, केंद्रीय ताकदीचा वापर करून सरकार पाडता येईल इडी, सीबीआयचा वापर करून महाराष्ट्रसह बंगाल राज्यातही सत्ता आली नाही, हे करून थकले असतील तर आर्मी लावा,” अशी शब्दात राऊत यांनी टीका केली आहे.
या टीकेला प्रतिउत्तर देताना केंद्रीय मंत्री व भाजप नेते “रावसाहेब दानवे म्हणाले ” की आमचे वैचारिक मतभेद असून वैयक्तिक मतभेद नाहीत. राजकीय, वैचारिक भाषा वापरा रणगाडे, खंजीरची भाषा चुकीची आहे. सरकार पाडण्यासाठी याची गरज नाही. राज्यात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती अनैसर्गिक आहे, आमची तयारी सुरू झालेली आहे.
२०२४ च्या निवडणुकीत यांना आम्ही नक्की धडा शिकवू, असा घणाघात केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर केला. याच संदर्भातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या टीकेला उत्तर दिल आहे. ते म्हणाले, संजय राऊत असं नेहमी बोलत असतात, त्यांना आरोप केल्याशिवाय जेवण पचत नाही. त्यांना आज जेवण चांगल पचेल, अशा शब्दात त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? शाह-फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय?
- लवकरच ‘धकधक गर्ल’ दिसणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर
- ‘…तर भाजपने ‘ईडी’, ‘सीबीआय’चे वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणेच बाकी आहे’
- बीडमध्ये राखेच्या अवैध वाहतूकीसंदर्भात पुन्हा एकदा गावकऱ्यांचा रोष
- विराटने दिलेले ‘हे’ चॅलेंज पत्नी अनुष्काने स्वीकारले, बॅट हातात घेतली अन्… पाहा मजेदार व्हिडिओ


