🕒 1 min read
बीड : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. जेव्हा मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळी लोकसभेत सर्वप्रथम हा मुद्दा मांडणारी मी महाराष्ट्रातील पहिली खासदार होते. आतापर्यंत तीन वेळेस मी मराठा आरक्षणासाठी लोकसभेत बोलले आहे, असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले. बाजोगाई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. याबाबत चर्चा करताना खासदार मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पूर्ण समर्थन असून आरक्षण निश्चितच मिळायला हवे अशी भूमिका मांडली. समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. त्याकडे जातीचे लेबल लावून पाहू नका. यापुढेही मराठा समाजाच्या लढ्यात आमचे पूर्ण योगदान राहील.
‘ओबोसीं’चा लढा राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे यासाठी आहे. तर मराठा समाजाचा लढा शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाच्या मागणीसाठी आहे. दोन्ही मागण्या भिन्न आहेत आणि या दोन्हीलाही आमचा सर्व ताकदीनिशी पाठिंबा आहे. धनगर समाजाला ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणा व्यतिरिक्त एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळतात, त्याच प्रमाणे आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाच्या सर्व सवलती मिळाव्यात अशी आपली भूमिका असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- खा.प्रीतम मुंडेंकडून नगर-बीड रेल्वे मार्ग कामाची पाहणी
- आ.धस यांच्या मोर्चाकडे भाजपचीच पाठ, ‘जेष्ठ’ नेत्यांच्या कानमंत्राने पदाधिकारी फिरकलेच नाहीत
- नांदेडमध्ये मानपान नाट्य; खा.चिखलीकर आणि आ.शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पाहा व्हिडिओ
- ‘सत्तेसाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू’, अशोक चव्हाणांची टीका
- ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?’, भाजप आ.अतुल भातखळरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
