मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.
तर, आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. यामुळे ईडी पुढे काय कारवाई करणार हे महत्वाचं असून आता राजकीय गोटामध्ये देखील हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीत पदोन्नती आरक्षण, स्वबळाचा नारा, ईडी कारवाई, प्रताप सरनाईक यांचे पत्र, आदी मुद्द्यांवरून तणाव काहीसा वाढला असतानाच पवारांच्या जवळ असलेले मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या अत्यंत निकटचे मंत्री वर्षा वर दाखल झाले आहेत. त्यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने अटकेसारखी कारवाई केल्यास महाविकास आघाडीला धक्का बसेल. त्यामुळेच, सरकारचं डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसं सामोरं जायचं या विषयांवरील चर्चेसाठी महत्वाची बैठक पार पडत असल्याचं सांगितलं जातंय.
महत्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमावणाऱ्या खेळाडुना मणिपुर सरकारकडुन कोट्यावधींची बक्षिसे जाहिर
- यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली
- कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी करत आहेत धडपड
- बारामतीच्या लता करे आजींना सोनू कक्करने दिली आर्थिक मदत
- अखेर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळणार; राज्य सरकारच्या निधीस मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
