Share

लसीकरणात भारत अमेरिकेच्याही पुढे, मोदींनी केले अभिनंदन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या लसीकरणात जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. याबाबतीत भारतानं अमेरिकेलाही मागे टाकले आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लसीचे एकूण १७, २१,२६८ डोस देण्यात आले. लसीकरणाचा एकूण आकडा ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ झाला आहे. अमेरिकेत लसीकरणाचा आकडा ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने भारतापेक्षा एक महिनाआधीच लसीकरण मोहीम सुरू केली होती.

भारताने लसीकरणात गाठलेल्या माईलस्टोननंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, भारतातील लसीकरण मोहिम आता वेग घेत आहे. लसीकरणाच्या मोहिमेत जे काम करतायत त्या सर्वांचे अभिनंदन. सर्वांना मोफत लस देण्याला आपलं प्राधान्य असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.

भाजप नेते अमित मालवीय यांनी कोरोना लसीकरणासंदर्भातील ट्विट करुन भारतानं केलेल्या विक्रमाची माहिती दिली आहे. मालवीय यांनी एक आकडेवारी मांडली असून यात अमेरिकेत १४ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. तर भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊनही आज देशानं अमेरिकेला मागे टाकलं आहे.

दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ हजार १४८ नवे रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २ लाख ७९ हजार ३३१ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ९६ हजार ७३० इतका झाला आहे. सध्या देशात ५ लाख ७२ हजार ९९४ सक्रीय रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!