Share

‘यामुळे’ मला भुजबळांच्या बुद्धीची कीव येते; हरिभाऊ बागडेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही. तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण ही रद्द झाले. निवडणुकीत ओबीसी जागेवर कोणते व किती उमेदवार उभे राहिले याचा डाटा राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. असे असताना छगन भुजबळ हे केंद्र सरकार आम्हाला डाटा देत नाहीत असे म्हणत आहेत. त्यांच्या बुद्धीची मला कीव येते अशी टीका भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी लगावला.

फुलंब्री तालुका भाजप व ओबीसी आघाडीच्यावतीने शनिवारी ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनास आ. हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांवर निशाणा साधला

काय म्हणाले होते भुजबळ?
ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकाद्वारे केंद्र सरकारकडे डेटाची मागणी करण्यात येणार आहे. परंतु भाजपनं केलेलं चक्का जाम आंदोलन हे राजकारणापोटी आहे. भाजपला दाखवून द्यायचे आहे की आम्ही ओबीसीं समाजासोबत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व करावं आणि केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मागावा असे आवाहन काल छगन भुजबळ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!