🕒 1 min read
मुंबई : मागील वर्षी कोरना प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे ओसरला नाही तरीही ही स्पर्धा आयोजीत करण्याचा घाट जापान ऑलिम्पिक संघटनेने घातला आहे. येत्या २३ ऑगस्टपासुन ही स्पर्धा टोकियो मध्ये सुरु होणार आहे.
मात्र यादरम्यान या स्पर्धेच्या पुर्वतयारी करत असलेल्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. भारताची आघाडीची धावपटु हिमा दास ही दुखापतग्रस्त झाली आहे. भारतीय अथेलिट्स महासंघाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. हिमा दासची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाहिये. पटियाला येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अंतरराज्य अथेलिट्स स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत धावताना तिच्या मांसपेशींमध्ये ताण पडल्याने ती दुखापतग्रस्त झाली. या दुखापतीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत ती खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
Fastest Four of #IndianAthletics @HimaDas8-Dhanalakshmi-Archana & @DuteeChand
We hope Hima Das recovers ASAP ???????? after muscle pull during 100m heats this morning at Inter-State meet. pic.twitter.com/T7MBTOtTWS
— Athletics Federation of India (@afiindia) June 26, 2021
प्रत्येक खेळाडुंचे स्वप्न असते की ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी खेळायचे आणि पदक जिंकायचे. हिमा दासचे पण देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. मात्र दुखापतीमुळे तिच्या स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे पथक हे कोणत्याही पुरस्कर्त्याशिवाय खेळणार आहे. कारण भारतीय पथकाची पुरस्कर्ती असलेली कंपनी लि निंगशी सुरु असलेला करार संपुष्टात आला आहे. क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘फायनल हा एकच सामना असतो’ ; बेस्ट ऑफ थ्रीवरून कोहलीला सुनावले
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
