Share

फडणवीसांना सत्तेत येण्याची गरज नाही, त्यांनी केवळ मार्ग सांगावा ; जयंत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचं काल राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी व्हेरायटी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्यातील ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारवर खापरं फोडतं. माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन,’ अशा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.

फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निशाणा साधला आहे. ‘ओबीसींना आरक्षण देण्यासाठी फडणवीसांना सत्तेत येण्याची गरज नाही. त्यांनी केवळ मार्ग सांगावा, आम्ही आरक्षणाचा तिढा सोडवतो,’ अशा शब्दांत जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. नांदेड येथील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, ‘फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहेत. म्हणजेच सत्तेत नसल्यावर ते काहीच करणार नाहीत. हा फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे.

त्यामुळे ओबीसींना आरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी सत्तेत येण्याची आवश्यकता नाही. आम्ही सत्ता चालवण्यास सक्षम आहोत. फडणवीसांना ओबीसींचा एवढाच कळवळा असता, तर त्यांनी भुजबळांवर इतका अन्याय केला नसता. त्यांना इतके वर्ष तुरुंगात खितपत ठेवलं नसतं. शिवाय एकनाथ खडसे सारख्या नेत्याला त्रास देऊन पक्ष सोडायला मजबूर केलं नसतं. त्यामुळे फडणवीसांचं ओबीसीसाठी सुरू असलेलं आंदोलन केवळ हस्यास्पद आहे.’ अशी विखारी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!