Share

‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राऊतांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वाधिक आमदार असून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. आता पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं असून राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची सुरु असलेली कारवाई, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र, अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अविनाश भोसले यांच्यावर ईडीची कारवाई, काँग्रेसचा स्वबळाचा नारा, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवरून सरकारच्या अडचणीत वाढ होत असून सरकारमधील अंतर्गत मतभेद देखील समोर येत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेबाबत चिन्हे दिसून येत आहेत.

याबाबत सामनाच्या रोखठोक सदरातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह केंद्र सरकारवर आरोपांची तोफ डागली आहे. तसेच, प्लॅन बी म्हणून भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव टाकत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना कोण ओळखत नाही! त्यांच्या भ्रष्टाचारविरुद्ध चळवळीने भल्याभल्यांची झोप उडवली. श्रीमती दमानिया यांनी सांगितले आहे की, ‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे.

श्रीमती दमानियांचे म्हणणे असे, ”अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. भोसले यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई म्हणजे भाजप किंवा केंद्राकडून ‘ईडी’ला मिळालेला आदेश आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर राजकीय कारणांसाठी होताना दिसत आहे.” अंजली दमानिया पुढे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचे, ”सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’प्रमाणे बोलणी सुरू असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे सर्व किळसवाणे राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळालीच पाहिजे हे त्यांचे ध्येय आहे!” सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी होतो. कर्जबुडवे, मनी लॉण्डरिंग करणाऱयांविरुद्ध कासवगतीने कारवाई होताना दिसते.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!