🕒 1 min read
पुणे : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचं काल राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी व्हेरायटी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्यातील ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारवर खापरं फोडतं. माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन,’ अशा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत टीकास्त्र सोडलं होतं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
संजय राऊत यांच्या टीकेचा आता भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना. संजय राऊत सारख्या भाटाची धनगर समाजाला गरज नाहीये. जे आदिवासींना ते धनगरांना, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या काळात १ हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. मात्र संजय राऊतांच्या मालकाने त्यातील १ रुपयाही खर्च केला नाही. याबद्दल त्यांनी बोलावं.’ असं आव्हान पडळकरांनी दिलं आहे.
ओबीसी समाजाकरिता फडणवीस सरकारने २३ जीआर (शासन निर्णय) काढले होते, हे संजय राऊतला माहित नाही. त्यातील १ ही जीआरची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही. या सरकारचा मी जाहीरपणे निषेध करतो, असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ख्रिस गेलसह युवराज सिंग ऑस्ट्रेलियामध्ये करणार धमाल ; ‘या’ क्लबसोबत करणार करार
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- ‘भाजपशी जुळवून घेतल्यावर सरनाईक सारख्यांचा त्रास कमी होईल याची खात्री काय?’
- फडणवीसांना सत्तेत येण्याची गरज नाही, त्यांनी केवळ मार्ग सांगावा ; जयंत पाटलांचा टोला
- ‘ते’ ३ कोटी अनिल देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले; EDचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
