औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ऑनलाईन शिक्षण त्यांना परवडणारे नाही. परिणामी हि मुले दिवसभर खेळण्यात, दंगामस्ती करण्यात तर काही जण चक्क बालमजुरी करत असल्याचेही दिसून आले. मात्र पालिकेच्या प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी यावर तोडगा शोधून काढलाच. तर आता मनपाचे शिक्षक थेट अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वर्ग घेत आहेत. आपल्या मुलांचा अभ्यास बुडत नसल्याचे पाहत मोलमजुरी करत हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसून आले.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गटा गटाने विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. यामुळे मुलांचा उत्साह देखील वाढला आहे. शाळा कधी उघडतात याची विद्यार्थी वाट पाहत आहे.
यातच आता शिक्षक घरी जाऊन शिकवत असल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ज्याठिकाणी सुलभ होइल अशा ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षण देत आहेत. या उपक्रमात शिक्षिका प्रतिभा गावंडे, शोभा पवार, रश्मी होनमुटे, सुनीता जोशी, स्वाती डीडोरे , बालताई मीरा मोरे हे मेहनत घेत आहेत.
कृतिपुस्तिका थेट विद्यार्थ्यांपर्यंत
येत्या काळात स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृतीपुस्तिका तयार करून त्या महानगरपालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. प्रत्येक पंधरा दिवसासाठी विद्यार्थ्यांना एक कृतीपुस्तिका दिली जाईल. १५ दिवसात विद्यार्थ्याने ती सोडवून पुन्हा शिक्षकांकडे जमा करावी त्यानंतर त्याला पुढील कृतीपुस्तिका दिली जाईल. ही कृतीपुस्तिका विद्यार्थ्यांना सहज सोडविता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’ ; कॉंग्रेसचा घणाघात
- जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार! औरंगाबादकरांच्या समस्यांमध्ये होणार वाढ
- ‘रोल मॉडेल‘ म्हणून पुढे येताना तरुणांनी आचरण उत्तम ठेवावे; राज्यपाल कोश्यारींचे आवाहन
- सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर ; सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध
- ‘राऊत चावी फिरविली तेवढेच सांगतात, नंतर भलतेच बोलतात’, रावसाहेब दानवेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
