नागपूर : आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. पुण्यात देखील भाजप नेत्यांनी आंदोलन करुन सरकारला जाब विचारला आहे.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी व्हेरायटी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘या राज्य सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचे महत्व ताटातल्या चटणी, कोशिंबीर प्रमाणे आहे. मात्र हे मंत्री आपल्या राजकीय आकांच्या सांगण्यावरून तेच बोलतात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे एक तर आरक्षण द्यावे लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल’, असं फडणवीस म्हणाले आहेत.
‘ओबीसीचे आरक्षण घालवले हे राजकीय षडयंत्र आहे. राज्याचे नेते काही झाले तर नरेंद्र मोदींकडे बोट दाखवतात. उद्या यांच्या बायकोनी मारले तरी तेव्हा देखील हे मोदी यांच्याकडेच बोट दाखवतील’, असा सणसणीत टोलाही लगावला.
‘या आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस आहे. काँग्रेस नेते या साठी आरक्षणात कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षण गेले. आमच्या हाती सूत्र द्या मी ओबीसींचे आरक्षण परत आणून दाखवले नाही तर राजकीय संन्यास घेईल’,अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल; फडणवीसांची घोषणा
- इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का ; जोस बटलर एकदिवसीय मालिकेतून बाहेर
- ‘मी आता स्वत: श्वास घेत आहे’; ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध दवेची कोरोनावर मात
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न


